भुसावळ नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी सौ.सोनी बारसे बिनविरोध :


भुसावळ – नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत नगरसेविका सौ.सोनी संतोष बारसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी असलेले तहसीलदार दिपक धिवरे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.

याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार , नगरसेवक युवराज लोणारी,निर्मल कोठारी, मुकेश पाटील, दिनेश राठी,संगीता देशमुख, शैलजा नारखेडे,शोभा नेमाडे,मनोज बियाणी,राजेंद्र नाटकर, महेंद्र सिंग ठाकूर,गिरिष महाजन,,पुष्‍पाबाई बत्रा, लक्ष्मी मकासरे सविता मकासरे दिपाली बऱ्हाटे, मेघा देवा वाणी, रमेश नागराणी व इतर नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान नूतन उपनगराध्यक्ष सौ.सोनी संतोष बारसे यांचा जळगाव रोडवरील काच बंगल्यात सत्ताधारी गटाच्या नगरसेवक यांनी फुलहार-पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे,नगरसेवक सुनिल नेवे,दिनेश नेमाडे,युवराज लोणारी,किरण कोलते,अँड.बोधराज चौधरी,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
तदनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सोनी संतोष बारसे सह सर्व नगरसेवक व कार्यकर्ते आमदार संजय सावकारे यांच्या भेटीसाठी रवाना झाले.