भुसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालयातील लाचखोर मंडळ अभियंत्यांच्या घरात सापडले 15 लाखांचे घबाड – नागपूर सीबीआयच्या कारवाईने रेल्वेतील लाचखोरांच्या गोटात खळबळ ;

भुसावळ : मंजूर झालेल्या दोन निविदांची वर्क ऑर्डर (स्वीकृतीपत्र) देण्यासाठी दोन लाख 40 हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- 1) एम.एल.गुप्ता व अभियांत्रिकी विभागातील कार्यालय अधीक्षक संजय रडे (ओ.एस.) यांना दोन लाख 40 हजारांची लाच कार्यालयातच स्वीकारताना नागपूर सीबीआयच्या पथकाने सोमवार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास डीआरएम कार्यालयातील अधिकार्‍यांच्या दालनातच अटक केली होती.
दरम्यान, रात्री उशिराने गुप्ता यांच्या निवासस्थानातून सीबीआय अधिकार्‍यांना 15 लाखांचे घबाड व काही महत्वपूर्ण कागदपत्रे सापडले आहेत.
दरम्यान गुप्ता यांच्या बर्‍हाणपूर, पुणे व मुंबईतील निवासस्थानांवरही छापे टाकण्यात आले आहेत.