भुसावळ रेल्वे विभागात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा :

भुसावळ – भुसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालयांमध्ये 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . भुसावळ विभागिय रेल्वे प्रबंधक एस. एस. केडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
रेल्वे सुरक्षा बला तर्फे रेल्वे प्रबंधक एस.एस.केडिया यांचे उपस्थितीत ध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी देशभक्ती पर गित सादर केले . मंडळ प्रबंधक एस.एस .केडिया म्हणाले की कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या सेवेला महत्त्व देऊन जनतेची सेवा केली आहे असे गौरवोद्गार त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांविषयी बोलताना वक्त केले आहे . कोरोना काळामध्ये ज्या रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत त्याविषयी ते म्हणाले की राज्य सरकारचे आदेश आल्यानंतर बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या त्वरित सुरू करण्यात येतील असेही कित्यांनी यावेळी म्हटले आहे .