महात्मा गांधी विद्यालयात ध्वजारोहण चंद्रशेखर झोपे यांच्या हस्ते संपन्न ;


वरणगाव – येथील दी वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय मध्ये संस्थेचे सचिव चंद्रशेखर झोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष वंदना पाटील शालेय समिती चेअरमन चंद्रकांत बढे उपाध्यक्ष कमलाकर चौधरी सदस्य राजेंद्र चौधरी नीळकंठ सरोदे मुख्याध्यापिका वंदना चव्हाण उपमुख्याध्यापक आर पी कुलकर्णी उपप्राचार्य जे एस गोसावी पर्यवेक्षक पी जे पाटील बी एम राठोड एम एम फलक आदी उपस्थित होते ध्वजारोहण झाल्यानंतर मानस गोपाळ पाटील व संगीत शिक्षक आर जे इंगळे यांनी देशभक्तीपर गीते सादर केले .

तर यावेळी विद्यालयातील 2010 बॅच मध्ये पास झालेला व सध्या नंदुरबार आरटीओ विभाग मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून काम करणारा विद्यार्थी तेजस देशमुख याचा सत्कार चंद्रकांत बढे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंगेश सोनार यानी केले