भुसावळ – भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे प्रमुख प्रवेश द्वार रस्त्यांचे विस्तारीकरण व बारा गाड्या साठी समांतर रस्ता बांधकामाला सुरुवात प्रमुख रस्त्याचे विस्तारीकरण तथा समांतर रस्ता निर्मितीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिनांक १६ ऑगस्ट पासून रस्ता बांधकामास सुरुवात केलेली आहे .
प्रसंगी उपसरपंच आनंद ठाकरे सरपंच पती विष्णू सोनवणे माजी सरपंच सुरेश पाटील गजानन कोळी सचिन पाटील राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांची उपस्थिती होती

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग सहाचे विस्तारीकरण होऊन गावाच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोर ओव्हर ब्रिज आल्याने महामार्गाची उंची अधिक होऊन गावातील प्रमुख रस्ता हा खाली आल्यामुळे रस्त्यामध्ये असमानता निर्माण झालेली होती यासंदर्भात गेल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम आयुष प्रोकाँ कंपनीचे प्रमुख इंजिनियर सुजान सर यांच्यासोबत उपसरपंच आनंद ठाकरे व सरपंच पती विष्णू सोनवणे अनिल सोनवाल जीवन पाटील यांनी भेट घेऊन येत्या महिन्यात बारागाड्या उत्सव असल्या कारणास्तव त्वरित समांतर रस्ता करण्याची मागणी गेल्या आठवड्यात केली होती.
त्यावर सुजानसिंग यांनी दिनांक 16 पासून गावातील प्रमुख रस्ता विस्तारीकरण बांधकामास सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट केले होते त्यानुसार त्यांनी शब्द पाळीत आज दिनांक 16 रोजी सकाळी दहा वाजता गावातील प्रमुख रस्त्याची पाहणी करून आखणी करण्यात आली व त्वरित कामास सुरुवात करण्यात आली सदरचा प्रमुख रस्ता आठ मीटर वृंद असून 70 मीटर लांबीचा आहे ओव्हर ब्रिज ते मारुती मंदिर ज्या ठिकाणी बारागाड्या थांबतात त्या स्थळापर्यंत, हा रस्ता होणार आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मरीमातेची यात्रा असून बारागाड्या उत्सव मोठ्या थाटात याठिकाणी संपन्न होत आलेला आहे तोच उत्सव यावर्षीदेखील साजरा व्हावा अशा पद्धतीने ग्रामपंचायत प्रशासनाचे आयोजन आहे त्याचबरोबर वाय पॉईंट रस्तादेखील त्वरित सुरू करण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने स्पष्ट केले आहे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने जे सहकार्य केलेले आहे त्याबद्दल साकेगाव ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन त्यांचे ऋणी आहे तसेच अजून त्यांच्याकडून गावातील इतर कामे लवकरच मार्गी लागतील असा विश्वास ग्रामपंचायत प्रशासन म्हणजेच सरपंच योगिता सोनवणे उपसरपंच आनंद ठाकरे ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे पप्पू राजपूत सागर सोनवाल कुंदन कोळी गजानन पवार सुभाष सोनवणे गणेश कोळी आदींनी व्यक्त केलेला आहे


