ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी खान्देश सुपुत्र कल्याणजी घेटे राष्ट्रपती पदकाने सन्मानित :


ठाणे – ठाणे जिल्हा तसेच शहरातील कोळशेवाडी येथे आपल्या कार्यकाळात संस्मरणीय व कौतुकास्पद कार्य व कामगिरी करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांनी संस्मरणीय व कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल गुणवत्ता सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कार जाहिर झाला आहे.
राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कार मिळाल्याबद्दल ठाणे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यामधूनही त्याचे अभिनंदन व कौतुक होत असून त्यांचेवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे . ते जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहे .
अतिसंवेदनशील एटीएस ठाणे जिल्हा मध्ये कार्यरत होऊन अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या निष्कलंक अधिकारी म्हणून त्यांचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये आवर्जून घेतले जात आहे .
दरम्यान स्वातंत्रदिनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालक मंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते कल्याणजी घेटे यांचा सत्कार करण्यात आला . प्रसंगी
पोलीस आयुक्त श्री जयजीत सिंग , जिल्हाधिकारी यांचेसह अधिकारी उपस्थित होते .


*पुरस्काराने अधिक काम करण्याची प्रेरणा – पो नि कल्याणजी घेटे* :
माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. देशात सर्वात महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार मला मिळाला याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. केंद्र सरकारने माझ्या कार्याची दखल घेतली ह्याबद्दल मी सरकारचा आभारी आहे तसेच हा पुरस्काराच्या माध्यमातून ह्यापुढेही अधिक कार्य करण्याची जबाबदारी वाढली असून भविष्यातही कर्तव्य व जबाबदारी सांभाळत कार्यात सातत्य टिकवून ठेवेन
अशी भावना पो नि कल्याण घेटे यांनी यानिमित्त व्यक्त केली .