भुसावळ रोटरी रॉयल्सतर्फे स्वातंत्र्यदिनी कर्तबगार व्यक्तींचा सन्मान :

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स आणि उदिता कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ शहरातील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान स्वातंत्र्यदिनी रविवार, 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता भुसावळ येथील रोटरी भवनात करण्यात येणार आहे. रोटरी रॉयल्स क्लब आणि शहरातील उदिता कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती तसेच दहावी व बारावी परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी असतील. या कार्यक्रमास भुसावळ विभागाचे पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्ची प्रमुख उपस्थिती असेल व त्यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण होईल. उपस्थितीचे आवाहन भुसावळ रोटरी रॉयल्सचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर, सचिव विनोद तायडे, उदिता कन्स्ट्रक्शनचे संचालक भुपेंद्र शर्मा व प्रकल्प प्रमुख गणेश फेगडे यांनी केले आहे.