भुसावळ (प्रतिनिधी )-
पतंजली योग समिती व
हिरो शोरूम भुसावळ यांच्या योग वर्गास आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी महिला पतंजली महाराष्ट्र पूर्व राज्य कार्यकारणी सदस्या सौ . महानंदा पाटील तसेच भा. स्वा. जि. प्रभारी अध्यक्ष भवरलाल प्रजापती सर यांची योग वर्गाला सदिच्छा भेट दिली. यावेळी सोबत मिडिया प्रभारी सुनंदा शिरसाड यासुद्धा उपस्थित होत्या .
यावेळी हिरो शो रूम भुसावळ योग वर्गातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .

कोरोना महामारी च्या काळात (ऑफलाईन ) शासकीय नियमांचे पालन करून सुर्यवंशी सर व त्यांचे सहकारी यांनी केलेले कार्य खुप अभिमानास्पद आहे . योगा क्लास घेऊन आपल्या बरोबर दुसर्याची ही काळजी घेतली हे कौतुकास्पद कार्य असल्याचे सांगून सौ महानंदा पाटिल यांनी मार्गदर्शन केले. प्रजापती सरांनी यावेळी योग विषयी महत्वपूर्ण व अमूल्य माहिती प्रदान करीत
विविध आजारां वरील ऑकयुप्रेशर पॉईंटबाबत माहिती दिली .तसेच काहींवर तेथे उपचार देखिल केला.प्रसंगी सौ .करुणा माळी यांचा वाढदिवस साजरा करून सर्वानी शुभेच्छा दिल्या. तर तुषार वाढे यांनी आभार व्यक्त करीत चिमुकल्याना शुभेच्छा दिल्या या योग वर्गास महिला व पुरुषांसह बालगोपाळांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती .


