कोकणातील ध्येयवेड्या तरुणाची पर्यावरणा विषयी जनजागृतीसाठी सह्यांद्रि ते हिमालयापर्यंत पदयात्रा ;

भुसावळ – आधुनिकीकरणाच्या या काळात नवनविन तंत्रज्ञांनाचा वापर करण्यात, सर्रास वृक्षतोड होत आहे , प्रगति होत आहे मात्र आपली पुढची पिढी आपल्या सारखा खुल्या मैदानावर व निसर्गाच्या सान्निध्यात मोकळा श्वास घेऊ शकेल का ? हा फार मोठा यक्ष प्रश्न आहे . याचे कारण दिवसेंदिवस होणारी वृक्षतोड , कमी होणारे जंगल!
वृक्षसंवर्धन व्हावे हा संकल्प करून , पुढच्या पिढिचा विचार करुन कोकणातील एक ध्येयवेडा तरुण सिध्दार्थ गणाई याने पर्यावरणा विषयी जनजागृती करत सह्यांद्रि ते हिमालय पर्वत पर्यंत एकट्याने पायी चालत ( पदयात्रा ) करीत प्रवास सुरु केलेला आहे . आता पर्यंत त्याचा ८००-८५० किमी पायी प्रवास झालेला असून आज या प्रवासा दरम्यान भुसावळ शहरात यावल रोडवर महात्मा गांधी पुतळ्या समोर या तरुणाचे आगमन झाले .

प्रसंगी शहरातील सुरेंद्रसिंग पाटील, चंद्रकांत चौधरी, किरण मिस्त्रि, संजु पाटिल, सतिष काबंळे, राजश्री नेवे, चेतन गणाई, हबिब चव्हाण, उमेश नेवे,कालु शहा, राजेंद्र जावळे, यांचेसह पर्यावरण प्रेमी नागरिक यांनी पर्यावरण प्रेमी सिध्दार्थ गणाई यांचे स्वागत व सत्कार केला तसेच त्याचे कार्याचे कौतुक करीत पुढील प्रवासाकरीता शुभेच्छा दिल्या .


यावेळी सिध्दार्थ गणाई याने सांगीतले की , प्रवासा दरम्यान बरेच ठिकाणी महामार्गावर वृक्ष नसल्याने प्रवास करतांना खुप त्रास झाला व एका एका झुडपाचे व त्याच्या सावलीचे महत्व क़ाय असते हे मला कळत होते, आणि म्हणून हि वेळ पुढचे पिढिवर येऊ नये यासाठीच ही पर्यावरण जनजागृतीची मोहीम हाती घेतल्याचे सिध्दार्थने स्पष्ट केले . दरम्यान भुसावळात आल्यानंतर
महात्मा गांधी पुतळ्या समोर सिध्दार्थच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . आता पर्यंतच्या या प्रवासात त्याने २० रोपांचे वृक्षारोपण केलेले आहे .