भूसावळ –
भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भुसावळ शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक धांडे, नगरसेविका शारदा धांडे यांच्यातर्फे श्रीनगर येथे १५-ऑगस्ट रोजी, दुपारी ४.०० वाजता माजी सैनिकांचा सत्कार समारंभ तसेच देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेना संपर्कप्रमुख विलास पारकर, सहसंपर्कप्रमुख माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा, माजी आमदार दिलीप भोळे, माजी जिल्हाप्रमुख जगदिशजी कापडे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, माजी तालुकाप्रमुख निळकंठ फालक, तालुका संघटक धिरज पाटील, उपतालुकाप्रमुख पप्पू बारसे, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, निलेश महाजन, माजी नगरसेवक अनिल भोळे उपस्थित असतील.

परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार:
जळगाव रोड परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांच्या देशहितकारक कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी माजी नगरसेवक ऍड. नरेंद्र लोखंडे, शिक्षकसेनेचे विभागीय पदाधिकारी हेमंत चौधरी, उपशहर प्रमुख राकेश खरारे, स्वप्नील सावळे, विभागप्रमुख अमोल पाटील, शाखाप्रमुख पिंटू भोई, चेतन भोई, प्रसिद्धीप्रमुख गोकुळ बाविस्कर परिसरातील माजी सैनिकांची माहिती गोळा करीत आहे.
गीत गायन स्पर्धेचे आयोजन:
देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले असून विजेत्यांना प्रथम पारितोषिक रु.५००१ व स्मृतिचिन्ह, व्दितीय पारितोषिक रु.४००१ व स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक रु.३००१ व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांना ऑडिशन देणे बंधनकारक आहे. नाव नोंदणीसाठी शिवसेना विभागीय कार्यालय, जुना सातारा येथे माजी नगरसेवक दीपक धांडे (9371277236), ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील (8805729473) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


