पैझरी पाड्यावर बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन;देवगिरी कल्याण आश्रम व स्वामी विवेकानंद हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम –

यावल – तालुक्यातील पैझरी या आदिवासी पाड्यांवर देवगिरी कल्याण आश्रम व स्वामी विवेकानंद हायस्कूल यांचे संयुक्त विद्यमाने या वस्तीवर विवेकानंद बाल संस्कार केंद्र सुरू करण्यात आले.
या पाडयांवर जवळपास 80 मुलं हे वेगवेगळ्या वयोगटातील आहेत पाड्यापासून इतर गावांना शिक्षण घेण्यासाठी या मुलांना तीन किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागते. लहान बालकांना हे शक्य नाही ही अडचण लक्षात आल्यामुळे आणि मुलांना प्राथमिक ज्ञान मिळून संस्कार व्हावेत म्हणून देवगिरी कल्याण आश्रम, भुसावळ यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी बाल संस्कार केंद्र सुरू करण्याचे ठरविले व विवेकानंद विद्यामंदिर यांच्या पुढे हा प्रस्ताव ठेवला त्यांनाही हा प्रस्ताव आवडला दोघं संस्थांच्या प्रयत्नाने पैझरी येथे या बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन झाले.


कल्याण आश्रमाचे प्रांत उपाध्यक्ष डॉ श्री किशोर मोरे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विवेकानंद विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री जयंतीलाल सुराणा यांनी स्वीकारले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ श्री निलेश भिरुड यांनी मुलांना बालसंस्कार केंद्रात मातांनी पाठवावे जेणेकरून त्यांना शिक्षण व स्वच्छतेची आवड निर्माण होईल असे सांगितले. डोंगरदे दत्त मंदिराचे स्वरूपानंद महाराज यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री काशीराम बारेला सरांनी केले श्री अमोल ठाकूर सर यांनी सूत्रसंचालन केले.


या वेळी मुलांना खाऊचे वाटप केले व बालसंस्कार केंद्रात शिक्षणासाठी आवश्यक सर्व साहित्य ठेवले. तसेच ॲड डि. बी पंडित यांच्याकडून मुलांना स्वच्छता कीट ब्रश, पेस्ट ,साबण ,टॉवेल देण्यात आले.
कार्यक्रमाला श्री अक्षय सराफ ,श्री सुरेश शर्मा ,श्री नीरज गंदे, श्री मधुकर वाणी, ॲड. निलेश भंडारी, ॲड. चित्रा आचार्य, ॲड. जयश्री देशमुख, दिनेश बारेला, प्रतिक्षा राणे, डोंगरदे सरपंच नवाज तडवी, योगेश पाटील, ॲड. राजेश बारी, ॲड गोविंद बारी व इतर ग्रामवासी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा खरे यांनी उपस्थितांचे ऋणनिर्देश केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ॲड जास्वंदी भंडारी (पाटील) कल्याण आश्रमाचे भुसावळ जिल्हा संघटनमंत्री वीरसिंग वसावे, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारीपैझरी पो.पा. जामसिंग बारेला ,दलसिंग बारेला, संतोष बारेला यांनी मेहनत घेतली.