इनरव्हिल क्लब ऑफ भुसावळ ब्लोसम चा पदग्रहण सोहळा उत्साहात:

भुसावळ – इनरव्हिल क्लब ऑफ भुसावळ ब्लोसम चा पदग्रहण सोहळा रोटरी भवन मध्ये उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहूण्या म्हणून रश्मी शर्मा व शितल भराडीया या होत्या.यावेळी रश्मी शर्मा यांनी क्लबच्या नुतन अध्यक्षा तृप्ती नागोरी यांना पदभार दिला तर शितल भराडीया यांनी रुचीता अग्रवाल यांना सेक्रेटरी पदाची सुत्रे दिली.या वेळी क्लब तर्फ़े होतकरू महिलांचा सन्मान केला त्यात


रिंकू केदारी व अरुणा बाविस्कर महिला पोस्टमन, जयश्री मन्ने परीचारीका,भावना शिंपी कंडक्टर अशा चार महिलांच्या चांगल्या कार्याबद्दल सन्मान केला.रश्मी शर्मा यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पल्लवी झोपे,सिद्दी तिवारी,राखी भराडे संजीवनी लाहोटी,इशा मनवानी,श्वेता लढ्ढा,वंदीता पारे,निलीमा निकम,निलीमा धांडे,अम्रीता बजाज यांच्या सह क्लब च्या सदस्या उपस्थित होत्या.सुत्रसंचालन व आभार रितीका हेडा यांनी केले.