बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर, आ.शिरीष चौधरी, आ.चंद्रकांत पाटील यांची होती प्रमुख उपस्थिती.

सावदा –
जनता शिक्षण मंडळ सभागृह खिरोदा ता.रावेर येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर यावल तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून महीला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या होत्या . पत्रकार हा देशाची ताकत असून लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. लोकशाही मध्ये महत्वपूर्ण कार्य पत्रकारांचे असते. असे गौरवोद्गार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
पुरस्कारांमध्ये पत्रकारांना दोन जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले त्यात दिलीप वैद्य सर रावेर, सुरेश जगन्नाथ पाटील यांना जीवन गौरव व मूकनायक देवलाल पाटील व दत्तात्रय पाटील यांना पुरस्कार देण्यात आले. इतरही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आमदार शिरीष चौधरी हे होते.
पुरस्कार वितरण महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे हस्ते,व हेल्मेट वाटप आ.शिरीष चौधरी, चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर, प्रवीण सपकाळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार संघ, किशोर रायसाकडा खानदेश विभागीय अध्यक्ष, प्रदीप गायके ग्रामीण जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ ,डिगंबर महाले उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पत्रकार संघ हे होते. यावेळी प्रास्ताविक उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले,
सुत्रसंचालन प्रा.दिलीप सोनवणे यांनी तर आभार रावेर तालुक्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अध्यक्ष विलास ताठे यांनी केले.


