भुसावळ – शहरातील जळगाव रोड विभागात ऑगष्ट क्रांती दिनानिमित्त दिनांक ९ ऑगष्ट रोजी सकाळी ८ वाजता श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी जवळ जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट ट्रामा आणि डायलिसिस सेंटर नवकार एक्सीडेंट हॉस्पिटल व नेत्रम हॉस्पिटल येथील नामांकित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.

या शिबिरात हृदयरोग, ब्लडप्रेशर, ऑक्सिजन लेव्हल, इसिजि तपासणी, मधुमेह तपासणी, हाडांची संपूर्ण तपासणी, नेत्र तपासणी सोबतच आरोग्यदायी योजनेंची माहिती दिली जाणार आहे. परिसरातील सर्व जेष्ठ नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक दीपक धांडे (9371277236) यांनी केले आहे.


