भुसावळला रेल्वे विभागात नविन प्रबंधक शंभू शरण केडीया रुजू होणार ;

भुसावळ : भारतीय रेल्वेतील 33 डीआरएम आणि तत्सम अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रेल्वे बोर्डाने काढले असून यात भुसावळला नवे डीआरएम म्हणून मुंबई येथील एस.एस.केडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे . भुसावळचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या बदलीच्या वृत्तास सुत्रांनीं दुजोरा दिला असून यांची बदली झाली असली त्यांना अद्याप नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही मात्र, त्यांच्या जागेवर मुंबई येथून एस.एस.केडीया यांची भुसावळला नियुक्ती करण्यात आली आहे .
गुप्ता यांचा येथील कार्यकाळ दोन वर्षांपेक्षा अधिक झाला होता. त्यामुळे त्यांची बदली झाली. दरम्यान, भारतीय रेल्वेतील या बदल्यांमध्ये मध्य रेल्वेतील नागपूर आणि मुंबई येथील डीआरएम यांचाही समावेश आहे.