महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर शनिवारी जळगाव जिल्हा दौर्‍यावर –

,

जळगाव : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर या शनिवार, 7 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. शनिवारी सकाळी 6.25 वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी आठ वाजता शासकीय विश्रामगृह येथून अकलूज, पाडळसे, बामणोद येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी, फैजपूर येथून महात्मा गांधी मार्गाने खिरोदाकडे प्रयाण, खिरोदा येथे कर्मयोगी धनाजी नाना चौधरी स्मृती मंदिर, खिरोदा येथे अभिवादन. खिरोदा येथून रोझोदा/कोचूर/सावदा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी व फैजपूरकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता फैजपूर, ता.यावल, जि. जळगाव येथे आगमन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीव्दारे आयोजित ’व्यर्थ न हो बलीदान’ कार्यक्रमास फैजपूर, जि. जळगाव येथे उपस्थिती व रविंद्रनाथ टागोर यांचे पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण, स्थ- धनाजीनाना महाविद्यालय, फैजपूर. दुपारी 12.00 ते 1.00 वाजता फैजपूर येथे राखीव, दुपारी 1.00 वा. फैजपूर, जि. जळगाव येथून यावल-किनगाव-चोपडा-शिरपूर मार्गे शासकीय वाहनाने चिमठाणा, ता.दोंडाईचा, जि. धुळे कडे प्रयाण