उधारीचे घेतलेले पैसे न दिल्याने चाकूने केला वार ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

भुसावळ – शहरातील गजानन महाराज मंदिरा जवळील दत्तनगर भागातील तरुणास चार इसमांनी वांजोळा रोडवरील सार्वजनिक जागी दिनांक 3/8/2021 रोजी रात्री 09:00 वाजेच्या सुमारास नेऊन शिवीगाळ करून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली असून चौघांवरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की फिर्यादी हर्षल जितेंद्र कदम वय 24 राहणार गजानन महाराज मंदिरा जवळ दत्त नगर भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रोहित भंगाळे यांचे कडून स्वतःच्या वाढदिवसासाठी घेतलेले 2,000 रुपये परत न दिल्याचे कारणावरून रोहित भंगाळे गोपाळ भंगाळे, तेजस बोरोले, गोविंदा बोरोले सर्व राहणार श्रीराम नगर भुसावळ भागातील यांनी फिर्यादिस वांजोळा रोडच्या बाजूस असले रेणुका माता मंदिर जवळ दिनांक 3/8/2021 रोजी रात्री 09:00 वाजेच्या सुमारास नेऊन शिवीगाळ करून रोहित भंगाळे यांने फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली मारली तसेच गोपाळ भंगाळे यांने फिर्यादीच्या पोटात डाव्या बाजूला व डाव्या पायाच्या मांडीवर पाठीमागील बाजूस चाकूने वार करून जखमी केला आहे. तसेच सर्व आरोपितांनी फिर्यादिस लथाबुक्क्यांनी मारहाण केली म्हणून दिनांक 4/8/2021 रोजी 06:17 वाजेच्या सुमारास भाग -5 गुरुन 348/2021 भादवी कलम 324, 323, 504,34 प्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनास्थळी सपोनि अनिल मोरे, पोना. समाधान पाटील अशांनी भेट दिली तर गुन्ह्याचा पुढील तपास पोना.रमण सुरळकर करत आहे.