जळगाव –
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जळगाव जिल्हा अध्यक्ष के .डी. चौधरी यांची जळगाव जिल्हा तेली समाजाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा या संस्थेच्या नावात बदल झाला असून प्रदेश तेली महासन्घ महाराष्ट्र राज्य असे नामकरण करण्यात आले आहे. प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष विजय वसंतलाल चौधरी यांनी के. डी. चौधरी यांना जळगाव जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले.

तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर ,आ माजी मंत्री यांचे आदेशानुसार तसेच माजी खासदार सुरेश वाघमारे , विक्रांत चांदवडकर, प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर दुर्गुळे, विजय काळे ,महिला अध्यक्षा सौ संध्याताई सव्वालाखे, प्रदेश कार्याध्यक्ष जयश्री अहिरराव, प्रदेश युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, युवक महासंघाचे महासचिव साई शेलार, युवक महासंघाचे कार्याध्यक्ष श्यामकांत इशी, सौ प्रतिभा चौधरी धुळे ,यांच्या सर्वसंमतीने के. डी .चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . के डी चौधरी यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी , श्यामकांत इशी, प्रदेश तेली सेवा महासंघाचे अध्यक्ष भागवतराव माणिक चौधरी, जळगाव जिल्हा कायदाविषयक महासंघाचे अध्यक्ष एडवोकेट वसंतराव भोलाने, प्रियाताई महिंद्रे , सुखदेव वंजारी , कृष्णराव हिंगणकर , प्रशांत जामखेड, नाशिक विभागाचे युवा महासंघाचे अध्यक्ष सदानंद चौधरी, नाशिक विभाग युवा महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत सुरडकर, जळगाव जिल्हा महिला महासंघाचे अध्यक्षा सौ निर्मलाताई रामचंद्र चौधरी ,आदी मान्यवरांनी के .डी .चौधरी यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीपत्र देताना प्रदेश महासंघाचे सचिव अशोक चौधरी, संदीप चौधरी, ,महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बी. एम. चौधरी , एडवोकेट वसंतराव भोलाने ,रामचंद्र चौधरी, प्रशांत सुरडकर, निर्मलाताई चौधरी देवकान्त के. चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी के. डी. चौधरी यांनी समाजासाठी अहोरात्र मेहनत घेण्याचे सांगून भरीव कार्य करण्याचे आश्वासन दिले . प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी ,युवा महासंघाचे कार्याध्यक्ष श्यामकांत इशी, सन्माननीय जयदत्त क्षीरसागर आणि सर्व वरिष्ठ नेत्यान्चे आभार मानले.


