जेसीआय ताप्ती क्लबच्या राष्ट्रीय अध्यक्षांची क्लबला धावती भेट.


भुसावळ – रांची येथिल जेसीआय ताप्ती क्लब च्या राष्ट्रीय अध्यक्षा राखी जैन यांनी गुरुवारी क्लब च्या सदस्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच क्लब मधील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या,क्लब मधील महीलांनी कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामगीरी बद्दल राखी जैन यांनी सर्व महिलांचे कौतुक केले.

यावेळी विभागीय अध्यक्ष अनूप गांधी,रिषभ शाह,जितेंद्र बोहरा,डॉ निलेश झवर,भुसावळ जेसीआयच्या अध्यक्षा निकिता अग्रवाल,सेक्रेटरी वर्षा जैन,जळगांव चे अध्यक्ष सुशिल जैन,पाचोराचे मयुर दायमा, जळगांव सेंट्रलचे श्रेनीक जैन,अजय चौधरी,संगीता अग्रवाल,डॉ मोनीका अग्रवाल,दिपा पटेल,मनिषा चोरडीया,सोनल झवर, योगिता झवर,आभा दरगड,कृष्णा अग्रवाल,लक्ष्मी अग्रवाल,हेमा बेहरा,जयश्री अग्रवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पुनित अग्रवाल यांनी सहकार्य केले. सुत्र संचालन डॉ मोनीका अग्रवाल यांनी तर आभार वर्षा जैन यांनी मानले.