अमृत भजनावली’ व ‘गीतगंगा’ पुस्तकाचे प्रकाशन –


भुसावळ –
शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सदगुरू झेंडूजी महाराज बेळीकर मठाचे मठाधिपती हभप भरत महाराज (नशिराबाद) यांचे कीर्तन नुकतेच झाले. यावेळी हभप भरत महाराज व आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते प्रभावती सुधीर पाटील यांनी संकलन केलेल्या ‘अमृत भजनावली’ व ‘गीतगंगा’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुधीर गंगाधर पाटील, विठ्ठल मंदिर समितीचे विश्‍वस्त सुहास फालक, नारायण महानुज, नीळकंठ सुदाम फालक, नीळकंठ भारंबे, बाळू यावलकर, राजू महाजन, मनोज महाजन, टाळकरी, भाविक व संत मंडळी उपस्थित होती.