पंढरपूर मठात पालखीचा पाच दिवस मुक्काम ;करिती क्षेत्र प्रदक्षिणा। त्याच्या पार नाही पुण्या ।।

मुक्ताईनग- मुक्ताईनगर येथून निघालेला मानाचा संत मुक्ताबाई पालखी सोहळा वाखरी येथील सकळ संतांचे भेटीनंतर 20 तास प्रवास करत रात्री 1 वा.मठात दाखल झाला. आषाढी एकादशी निमित्त नगर परिक्रमा काल करण्यात आली.
संत मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी – मुक्ताईनगर येथून निघालेली मुक्ताई पालखी वाखरी तळावर आपल्या भावंडांचे सकळ संतांचा भेट सोहळा झाला.वाखरीतुन फक्त 2भाविकांना पायी चालण़्यास दिलेली परवानगी दहाही दिंडी चालकांना मान्य नव्हती यावर प्रशासनाशी चर्चा करण्यात बराच वेळ गेला अखेर तीस वारकरी ईसवाबी पासून पायी चालण़्यास परवानगी मिळाली. पंढरपूरात मुक्ताबाई मठात पोहचण्यास रात्रीचा 1वाजला होता. पाच दिवस मुक्काम मठातच राहील येथेच दैनंदिन कीर्तन प्रवचन भजन आदी नित्योपचार पार पडत आहे.आषाढी एकादशी निमित्त नगर परिक्रमा करण्यात आली.सकाळी ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे व दुपारी ह.भ.प.संदिप महाराज खामणीकर यांचे कीर्तन पार पडले. एकादशी पासून पांडुरंगास नैवेद्यासाठी परवानगी असून फराळाचा पहिला नैवैद्य सम्राट पाटील व श्रध्दा पाटील यांनी दिला.
एकादशीस चंद्रभागा स्नान पासुन भाविक वंचित
आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेच्या स्नानास अनन्यसाधारण महत्त्व वारकर्यात आहे परंतू प्रशासनाने ऐनवेळी चंद्रभागा स्नान नाकारल्याने नगरपरिक्रमेवरच समाधान मानावे लागले. आज बुधवारी पादूका स्नानास परवानगी मिळाली आहे.


