कायद्याचा सक्त वापर करून गुन्हेगारी मोडीत काढावी आ. संजय सावकारे यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार :


भुसावळ –
भुसावळातील गुन्हेगारी थोपवण्याबाबत आमदार संजय सावकारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
भुसावळात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अवैध दारूच्या कारखान्यावर पुण्याच्या भरारी पथकाने कारवाई केल्यानंतर स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागासह स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही यानिमित्ताने प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. या अनुषंगाने आमदार सावकारे यांनी तक्रार केली आहे. भुसावळ शहर आधीच चोरी, हाणामारी, खून व खंडणी आदी प्रकारामुळे बदनाम असून त्यातच आता दारूच्या अवैध कारखान्यावर कारवाई झाल्याने या प्रकाराला काही लोकांचा आशीर्वाद असल्याने हे अवैध धंदे बंदच होवू शकत नाही, असे पत्रात नमूद आहे. पोलीस प्रशासनाने कायद्याचा सक्त वापर करून गुन्हेगारी मोडीत काढावी व जनतेत पोलीस दलाची प्रतिमा उंचवावी, असा आशावादही पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.