अकोला शहरात गौरक्षण रोडवर भावाने केली बहिणीची हत्या –


अकोला –
शहरातील गोरक्षण रोडवर भावाने 20 वर्षीय बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास घडली. नेहा नंदनलाल यादव असे मृतक तरुणीचं नाव आहे.शहरातील गोरक्षण रोडवरील माधव नगर येथील ऋषिकेश उर्फ़ बॉबी राममोहन यादव 24 व नेहा नंदनलाल यादव 20 या दोन बहिण भावावर मध्ये हेडफोन वरून वाद झाला. या वादाचे पुनर्वसन हाणामारीत झाल्याने ऋषिकेश उर्फ़ बॉबी राममोहन यादव याने बहिणीची निर्घुण हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला आहे.खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डीसी खंडेराव यांच्या मार्गदर्शनात मारेकरी आरोपी ऋषिकेश उर्फ़ बॉबी राममोहन यादव याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आरोपी बॉबी यादव हा मृतक नेहाचा मामेभाऊ आहे. या हत्येमागचे मुख्य कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नसून खदान पोलिस अधिक तपास करीत आहेत.