भुसावळ – तालुक्यातील वांजोळ्यातील विवाहितेचा कुलरचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजता घडली. शारदा वसंत बावस्कर (धनगर, 27) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

शनिवारी सकाळी विवाहिता घरात घरकाम करत असतांना त्यांना घरातील कुलरचा लॉक लागल्याने त्या फेकल्या गेल्या मात्र त्यानंतरही त्यांचा पाय कुलरला लागूनच असल्याने त्या अत्यवस्थ झाल्या. घटना उशीरा लक्षात आल्याने त्यांना रीक्षातून भुसावळ आणत असतांना भुसावळ रोडवरील सत्संग भवनाजवळ रीक्षा अचानक बंद पडली व या दरम्यानच विवाहितेचा मृत्यू झाला. डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार विजय पोहेकर, नितीन सपकाळे, रज्जाक यांच्यासह वीज वितरण कंपनीचे साकेगावचे कनिष्ठ अभियंता डी.आर. कोल्हे व कर्मचार्यांनी घटनास्थळी पाहणी केली.


