भुसावळ –
भुसावळातील शिवपूर कन्हाळा रोडवरील एका फर्नीचरच्या गोदामात अवैध मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पुणे यांनी
जप्त केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे .
तालुक्यातील शिवपूर कन्हाळा करण्याची कारवाई रोडवरील वैष्णवी कॉलनी प्लॉट नंबर 3 मधील श्री गणेश कोटिंग अँड फर्निचर फॅक्टरीत बनावटी देशीदारू बनविण्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पुणे यांनी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उध्वस्त केला .
दरम्यान याप्रकरणी फिर्यादी एस.एस.पोंघे यांनी फिर्याद दीली की दिनांक १७/७/२०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील शिवपूर कन्हाळा रोडवरील वैष्णवी कॉलनी प्लॉट नंबर 3 मधील गणेश कोटिंग अँड फर्निचर फॅक्टरीत बनावटी देशीदारू बनविण्याचा कारखाना कित्येक दिवसापासून सुरू असून आज रोजी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पुणे यांनी उध्वस्त केला . या गोदामात ३५० देशी दारू तयार केलेले बॉक्स,बुच सील करण्याची एक मशीन,दोन गॅस सिलेंडर,स्पीरीड १५ टाक्या ,६ टाकी रिकामी,देशीदारू तयार करण्याचे केमिकल,बुच,रिकाम्या बाटल्या,स्टिकर,पाण्याच्या दोन टाक्या असे एकूण ११ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सदर कारवाईत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे आयुक्त कोतीलाल उमाम,उपआयुक्त प्रसाद सुर्वे, निरीक्षक डिंगबर शेवाळे,दुय्यम निरीक्षक एस.आर.गायकवाड (तपास अधिकारी),निरीक्षक एस.के.कोल्हे,दुय्यम निरीक्षक प्रकाश अहिरराव,दुय्यम निरीक्षक कैलास चत्रे,एस.एस.आय.रान माळकर संजय,एस.एस.आय.कंढाळे विकास,जवान अमर कांबळे, एन.एम.शेख, प्रवीण साळवे अशांनी मिळून केली. दरम्यान
या प्रकरणा बाबत स्थानिक राज्य उत्पादन शुल्क अनभिज्ञ असून
घटनास्थळी भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी पुणे भरारी पथकाच्या कारवाई झाल्यानंतर पोहचले .



