भुसावळात सुरभी नगर भागात घरफोडी – लाखोचा ऐवज लंपास ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात चोरटयांनी बंद घरांना लक्ष करीत येथील सुरभी नगर भागात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास राजेश्वर नगर व समृद्धी पार्क मध्ये घरफोडी करीत लाखो रूपयांच्या सोन्या चांदिचा ऐवजलंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व झालेल्या लॉकडाऊनचा उद्योगधंदयांवर फार विपरीत परिणाम होत आहे बेरोजगारी वाढल्यामुळे सध्या रस्ता लूट,दरोडे,चोरीचे सत्र सुरू असून घरफोडीचे प्रमाण वाढत आहे . आज २७ रोजी भुसावळ शहरातील सुरभी नगर भागातील प्लॉट नंबर एस -१२ राजेश्वर नगर मधील अर्चना अरुण तारे यांचे राहत्या घराचे चोरट्यांनी दरवाजाचे कडी कोंडा तोडून आत प्रवेश
करून २० हजार रुपये रोख व सोन्याच्या बांगड्या असे ऐवज लांबविला आहे.तर समृद्धी पार्क मधील अनिल प्रभाकर धांडे प्लॉट नंबर पी – ३०२ या घरातील दरवाजाचे कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला असून घरमालक पुणे येथे असल्याची माहिती घटनास्थळी पाहणी करणारे पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.शहरातील सुरभी नगराजवळ राजेश्‍वरी नगरासह समृद्धी पार्क भागात बंद असलेल्या घराला चोरट्यांनी टार्गेट करीत लाखोंच्या सोन्यासह रोकड लांबवल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर त्याने काही अंतरापर्यंतचा माग दाखवला. घर मालक गावाहून परतल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तसेच याच इमारतीतील शेजारील सैनी नामक इसमाच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,सपोनि मंगेश गोंटला,पोकॉ विकास सातदिवे,ईश्वर भालेराव,होमगार्ड योगेश सोनवणे अशांनी भेट देऊन पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *