नाहाटा महाविद्यालयात “गणित व इतिहास : स्पर्धा परीक्षेकरीता दीपस्तंभ “ कार्यशाळा संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे गणित व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेबाबत रुची निर्माण होऊन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यावा व उत्तम प्रशासक व्हावे. या उद्देशाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सौ. एम. व्ही.वायकोळे, उप प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ. बी. एच्. बऱ्हाटे, डॉ. एन. ई. भंगाळे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘गणित व इतिहास : स्पर्धा परीक्षेकरीता दिपस्तंभ’ Online कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उदघाटक म्हणुन चोपडा महाविद्यालयातील प्रा. डॉ. हरेश गंभीर चौधरी उपस्थित होते. तर अध्यक्ष म्हणुन प्रा. डॉ. ए. डी. गोस्वामी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. आशिष नवघरे यांनी करून दिला तर सूत्रसंचलन डॉ. दिपक शिरसाट यांनी केले.
उदघाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर प्रथम सत्रात प्रा. डॉ. हरेश गंभीर चौधरी यांनी ‘सामान्य गणित’ या विषया अंतर्गत कॅलेंडरवर आधारित प्रश्न, वैदिक गणितातील पाया व बाकी , गुणाकार युक्त्या यावर मार्गदर्शन केले. त्यांनी 15 युक्त्या अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने मुलांना उलगडून सांगितल्या.
दुसऱ्या सत्रात डॉ. प्रशांत देशमुख, गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी यांनी ‘इतिहास व स्पर्धा परीक्षा’ या विषया अंतर्गत प्राचीन, मध्ययुगीन कालखंडाचा मागोवा व आधुनिक भारतातील ब्रिटिश गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड बेंटीक, लॉर्ड डलहौसी, इ. ची ओळख, कायदे, सुधारणा व कार्य इ. बदल सखोल मार्गदर्शन केले तर शेवटच्या सत्रात प्रा. आशिष नवघरे यांनी ‘बुद्धिमत्ता चाचणी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी वर्गीकरणावर आधारित प्रश्न, सामान्य ज्ञान, सांकेतिक भाषासंबंधित प्रश्न, दृश्ययुक्तीवादाशी संबंधित प्रश्न, गणितीय बुद्धिमत्ता इ. घटकांवर मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेत महाविद्यालय व महाविद्यालया बाहेरील 117 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर समारोप समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणुन प्रा. आशिष नवघरे व डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टेक्निशियन म्हणुन प्रा. हर्षल पाटील यांनी अनमोल सहकार्य केले. तसेच प्रा. ए. एच. पाटील, डॉ. दिपक शिरसाट, प्रा. प्रणिता राणे, प्रा.नेहा महाजन आदींनी परिश्रम घेतले.


