रोटरी क्लब चे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांची भुसावळला भेट.


भुसावळ (प्रतिनिधी )-
रोटरी चरित्र विकसित करते आणि मानवी भावनेतून सर्वोत्कृष्ट बनवते. रोटरी लोकांना नीतिशास्त्र, मानवता,सांस्कृतिक जागरूकता आणि सेवा करण्याची इच्छा शिकवते. जागतिक समज आणि शांती वाढविण्यासाठी रोटरी अधिक सकारात्मक वातावरण तयार करते. भुसावळ रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून
प्रांतपाल शब्बीर शाकीर, फर्स्ट लेडी जुमनाजी, डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी टाॕबी भगवागर,अतुल शहा हे उपस्थित होते,यावेळी
रोटरी क्लब भुसावळचे अध्यक्ष गजानन ठाकुर,सचिव गिरीश कुलकर्णी,रोटरी क्लब रेलसीटी अध्यक्ष संदिप जोशी,सचिव विशाल शाह,रोटरी क्लब ताप्ती व्हॕली अध्यक्ष सुधाकर सनांसे,सचिव संजु भटकर,रोटरी क्लब राॕयल चे अध्यक्ष ऊमेश नेमाडे,सचिव राजेंद्र यावलकर यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन गिरीष कुळकर्णी तर आभार संजू भटकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *