मुंबई – गोरखपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ ;

रेल्वेने 05402/05401 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर विशेष आणि  01355/01356 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष वातानुकूलित गाड्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती पुढे दिल्यानुसार:
05401 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २३.६.२०२१, ३०.६.२०२१ आणि ७.७.२०२१ (३ फे-या) रोजी चालविण्यात येणार आहे.  
05402 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष दि. २५.६.२०२१, २.७.२०२१ आणि ९.७.२०२१ (३ फे-या) रोजी चालविण्यात येणार आहे.  
01355 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष वातानुकूलित दि. २९.६.२०२१, ६.७.२०२१ आणि १३.७.२०२१ (३ फे-या) रोजी चालविण्यात येणार आहे.  
01356 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष वातानुकूलित दि. १.७.२०२१, ८.७.२०२१ आणि १५.७.२०२१ (३ फे-या) रोजी चालविण्यात येणार आहे.  
टीप – या गाड्यांच्या विद्यमान थांबे व वेळेत कोणताही बदल होणार नाही.  
आरक्षण-  05402 आणि 01355 या विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २४.६.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया 
www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.  
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.  
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *