भुसावळ (प्रतिनिधी )-

कोविड १९ च्या महामारीमुळे भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट सुरु केले होते. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन द्वारा भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटची सुविधा दिनांक 11.06.2021 पासून सुरू करीत आहे. सर्व स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत दहा रुपये असेल.(रुपये 10 )
रेल्वे प्रशासन प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानावर कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


