कोचिंग क्लासेस पुन्हा सुरू करावे- कोचिंग क्लासेस असोसिएशनची मागणी ; जिल्हाधिकारी यांना निवेदन ;

जळगाव –
१४ महिन्यापासून बंद असलेले कोचिंग क्लासेस पुन्हा सुरू करण्यासाठी कोचिंग क्लासेस असोसिएशन तर्फे मागणी करण्यात आली असून याबाबत

७रोजी शहराचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व महापौर सौ जयश्री सुनील महाजन यांना निवेदन देण्यात आले .
निवेदनामध्ये असे म्हटले आहे की पूर्ण नियमावलीमध्ये क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्या, कारण गेल्या चौदा महिन्यापासून कोचिंग क्लास चालविणाऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नसून , कोचिंग क्लास वाल्यांचे ऑफिस भाडे ,घर भाडे ,बँकेचे हप्ते ,घरखर्च संपूर्ण थकीत आहे ,तरी क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे .
निवेदन देतांना कोचींग क्लासेस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पंकज नाले, शहराध्यक्ष राहुल निकम सर , सदस्य आर सी पाटील सर ,सह संघटक शिरीष पाटील सर, शहर सचिव संदीप पाटील सर ,संघटन प्रमुख विजय सोनवणे सर ,उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *