जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने मास्क व सॅनिटाइझर वाटप ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भुसावळ येथील गवळी वाडा येथे कोरोना महामारीस आळा घालण्यासाठी या परिसरातील जनतेस शनिवार रोजी मास्क व सॅनिटाइझर वाटप करण्यात आले.
जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड.संदिपभैय्या पाटील यांच्या सूचनेनुसार व प्रदेश काँग्रेसचे योगेंद्र भैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगांव जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने येथील गवळी वाडा या परिसरातील जनतेस शनिवार रोजी मास्क व सॅनिटाइझर वाटप करण्यात आले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे योगेंद्र भैय्या पाटील, जळगांव जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, उपाध्यक्ष इस्माईल गवळी, भुसावळ काँग्रेस अनु जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे, सागर कुरेशी, राजा खान, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *