भुसावळ (प्रतिनिधी )-
जिल्ह्यात मोटार सायकल चोरी गुन्हे प्रकरणी येथील नसरवानजी फाईल परिसरातील एका मोटर सायकल चोरास जळगाव एलसीबीने गुरुवार रोजी रात्री ताब्यात घेतले .
पोलिस पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी जळगाव जिल्ह्यात मोटार सायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार स.फौ.अशोक महाजन , स.फौ.शरीफ काझी, पो.ना.युनुस शेख, पो ना किशोर राठोड , पो काँ. विनोद पाटील , पो काँ रणजित जाधव यांचे पथक रवाना केले होते.
या पथकाने भुसावळ येथील संशयित आरोपी शेख इरफान शेख बशीर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता . त्याने येथील नसरवंजी फाईल येथून एक गाडी चोरली असल्याचे कबूल करून चोरलेली गाडी काढून दिली . गाडीचा
भुसावळ बाजार पेठ
पो. स्टे.भाग 5 गु. र. न.468/2019 ipc 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीस वैदेकिय तपासणी करून मुद्देमाल सह भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.



