भुसावळात आपत्ती निवारण समिती व नारी शक्ती पर्यावरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण व पर्यावरण संदर्भात जनजागृती ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात आपत्ती निवारण समिती व नारी शक्ती पर्यावरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने फलक लावून जनजागृती मोहिम राबविण्यात आली .
या उपक्रमात अंर्तगत शहरातील बँका, नगरपालिका दवाखाने , बाजार परिसर , बस स्टाँप, सरकारी कार्यालये अश्या ठिकाणी फलक लावण्यात आले . तसेच नारी शक्ती मंचच्या वतीने पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत असून सुरवात स्वामी विवेकानंद शाळेत जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. नंतर जळगाव जनता बँकेत बँनर लावून या उपक्रमाला सुरवात झाली. १ जून पासून लाँकडाऊन शिथिल करण्यात आले त्यामुळे नागरिकांनी बाजारात, बँक , बस स्टाँप याठिकाणी गर्दी करण्यास सुरवात केली. जर ही गर्दी अशीच वाढत गेली तर तिसरी लाट नक्कीच येईल यात शंका नाही यासाठी महामारीपासून वाचायचं असेल तर लसीकरण हा एकच उपाय आहे म्हणून सर्वांनी लसीकरण करावे अशी जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी यासाठी हा उपक्रम राबविन्यात येत आहे . ही मोहिम तालुक्यातील आजूबाजूच्या खेड्यांवरही राबविणार असल्याचे महिला समन्वय प्रमुख अँड जास्वंदी भंडारी यांनी सांगितले.नारी शक्ती पर्यावरण मंचच्या तालुका अध्यक्ष सुनंदा खरे यांनी म्हणाल्या की आँक्सिनज किती आवश्यक आहे हे पाहिले म्हणून वृक्षारोपण करून पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे सांगितले . यावेळी बँकेचे कर्मचारी,आशा वर्कर्स, सदस्य आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *