भुसावळ (प्रतिनिधी )-
अंतराळात सोडलेले उपग्रहांमधून उत्कृष्ट उपग्रहाची दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे यात भुसावळच्या ताप्ती पब्लिक स्कूलचा दहावीचा विद्यार्थी कृष्णा ढाके याने सोडलेले उपग्रहांचाही सहभाग आहे, त्याबद्दल कृष्णा यास गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड,अशिया बुक ऑफ रेकॉर्ड,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे . या संशोधनामुळे भविष्यात विविध संशोधन करणाऱ्या संस्थेला भेट देण्याची मोठी संधी मिळू शकते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन हाऊस ऑफ कलाम व स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 7 फेब्रुवारी 2020 रोजी रामेश्वरम येथे अंतराळात लहान लहान असे छोटे छोटे 100 उपग्रह सोडण्याचा महत्वाकांशी जागतिक विक्रम करण्यात आले , त्यात देशभरातील एक हजार व महाराष्ट्रातील 380 विद्यार्थी सहभागी झाले होते यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते तसेच नागपुर व पुणे येथे एक दिवसाचे वर्कशॉप घेण्यात आले त्यात कृष्णाढाके याने सहभाग घेतला होता त्यात त्यांनी छोटे छोटे फेम्टो सॅटॅलाइट बनवले होते. हेलियम बल्लून च्या साह्याने 100 उपग्रह अंतराळात सोडण्यात आले त्यांची कृषिविषयक शास्त्रीय अभ्यासाला उपयुक्त माहिती तसेच पर्यावरणातील ओझोन वायूचा स्तर,रेडिएशन्स ची माहिती,ग्लोबल वॉर्निंग व इतर विविध प्रकारच्या शास्त्रीय माहिती उपग्रहाद्वारे मिळाल्या याची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये यशस्वी नोंद झाली असून आशिया वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा त्याची दखल घेतली आहे, बुक वर्ल्ड रेकॉर्ड,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड असे विविध 5 प्रकारचे विश्वस्त विश्व स्तरावर व देश स्तरावर रेकॉर्ड झालेले असल्याची माहिती कृष्णाने दिली,याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कृष्णा हा गण गण गणात बोते आयटीआय चे अध्यक्ष सतीश ढाके यांचा मुलगा आहे भविष्यात या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्याला विविध प्रकारची उपकरणे बनवून त्याच्या नोंदी घेण्याचा छंद आहे, भुसावळातील ताप्ती पब्लीक स्कुलचा दहावीचा विदयार्थी चे नाव गिनीज बुक व इतर ठिकाणी गेल्याने त्याचे शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर यांनी कौतुक केले. यासाठी त्यांला ठाणे येथील प्रा.डॉ.मिलिंद चौधरी,मनीषा चौधरी यांचे सहकार्य लाभले.

फोटो ओळ – कृष्णा ढाके याला प्रमाणपत्र देतांना ताप्ती पब्लीक स्कुलच्या प्रिंसीपल निना कटलर सोबत सतीश ढाके.


