पनवेल आणि गोरखपूर /छपरा दरम्यान पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या ;

पनवेल आणि गोरखपूर /छपरा दरम्यान पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या ;
भुसावळ –
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पनवेल – गोरखपूर व पनवेल – छपरा दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित ग्रीष्मकालीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढे दिलेल्यानुसार:
१. पनवेल – गोरखपूर – पनवेल विशेष (१४ फेरी)
05064 विशेष पनवेल येथून दि. ७.६.२०२१, ११.६.२०२१, १४.६.२०२१, १८.६.२०२१, २१.६.२०२१, २५.६.२०२१ आणि २८.६.२०२१ ( ७ फे-या) रोजी १४.२० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्‍या दिवशी १९.२० वाजता पोहोचेल.
05063 विशेष गोरखपूर येथून दि. ६.६.२०२१, १०.६.२०२१, १३.६.२०२१, १७.६.२०२१, २०.६.२०२१, २४.६.२०२१ आणि २७.६.२०२१ ( ७ फे-या) रोजी ०८.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्‍या दिवशी १२.४० वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, झांसी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती, खलीलाबाद.
संरचना : २ तृतीय वातानुकूलित, ८ शयन आणि १२ द्वितीय आसन श्रेणी.

  1. पनवेल – छपरा – पनवेल अतिजलद विशेष(6 फे-या)
    05194 विशेष पनवेल येथून दि. १३.६.२०२१, २०.६.२०२१ आणि २७.६.२०२१ ( ३ फे-या) रोजी २३.४० वाजता सुटेल आणि छपरा येथे तिसर्‍या दिवशी ०५.३० वाजता पोहोचेल.
    05193 विशेष छपरा येथून दि. १२.६.२०२१, १९.६.२०२१ आणि २६.६.२०२१ ( ३ फे-या) रोजी १५.३५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्‍या दिवशी २२.५० पोहोचेल.
    थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज जंक्शन, वाराणसी, गाजीपूर शहर, बलिया.
    संरचना : २ तृतीय वातानुकूलित, ८ शयन आणि १२ द्वितीय आसन श्रेणी.
    आरक्षण : संपूर्णतः आरक्षित 05064 व 05194 या विशेष गाडी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ३.६.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
    तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
    केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
    प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी सीओव्हीआयडी 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *