जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात १६४ नव्या रुग्णांची नोंद ;


जळगाव

जिल्ह्यात आज दिवसभरात १६४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

दरम्यान १मे पासून जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. रुग्णांसह मृताचा देखील आकडा कमी झाला आहे. आजच्या रुग्ण वाढीसह जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४० हजार ३०६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

तर १ लाख ३३ हजार ००९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५३९ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या ४ हजार ७५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-१८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३२, अमळनेर-१, चोपडा-५, पाचोरा-३५, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-११, पारोळा-६, चाळीसगाव-२६, मुक्ताईनगर-१५, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *