उन्हाळी विशेष ट्रेनच्या सेवांचा विस्तार ;

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने सुधारित संरचना व विशेष शुल्कासह पुढील उन्हाळी विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल पुढे दिलेल्यानुसार:

अ. पुण्यातून विशेष ट्रेनचा विस्तार

१. 01329/01330 पुणे – गोरखपूर विशेष
01329 पुणे – गोरखपूर विशेषच्या सेवा दि. १.६.२०२१, ३.६.२०२१, ५.६.२०२१, ८.६.२०२१, १०.६.२०२१, १२.६.२०२१ व १५.६.२०२१ ( ७ फे-या) रोजी आणि
01330 गोरखपूर – पुणे विशेष सेवा दि. ३.६.२०२१, ५.६.२०२१, ७.६.२०२१, १०.६.२०२१, १२.६.२०२१, १४.६.२०२१ व १७.६.२०२१ ( ७ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत

२. 01331/01332 पुणे – दानापूर विशेष

01331 पुणे – दानापूर विशेष सेवा दि. ४.६.२०२१, ७.६.२०२१, ११.६.२०२१ व १४.६.२०२१ ( ४ फे-या) रोजी चालविण्यात येतील आणि
01332 दानापूर-पुणे विशेष अतिजलद सेवा दि. ५.६.२०२१, ८.६.२०२१, १२.६.२०२१ व १५.६.२०२१ ( ४ फे-या) रोजी चालविण्यात येतील.

३. 01333/01334 पुणे – दरभंगा विशेष

013333 पुणे – दरभंगा विशेषच्या सेवा दि. ३.६.२०२१ व १०.६.२०२१ ( २ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत आणि
01334 दरभंगा- पुणे विशेषच्या सेवा दि. ५.६.२०२१ व १२.६.२०२१ ( २ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत आणि

४. 01335/01336 पुणे – भागलपूर विशेष

01335 पुणे – भागलपूर विशेषच्या सेवा दि. ६.६.२०२१ व १३.६.२०२१ ( २ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत आणि
01336 भागलपूर – पुणे विशेषच्या सेवा दि. ८.६.२०२१ व १५.६.२०२१ ( २ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.

ब. मुंबई येथून/पर्यंतच्या विशेष ट्रेनच्या सेवांचा विस्तार

५. 01359/01360 मुंबई – गोरखपूर विशेष
01359 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – गोरखपूर विशेषच्या सेवा दि. २.६.२०२१, ४.६.२०२१, ६.६.२०२१, ७.६.२०२१, ९.६.२०२१, ११.६.२०२१, १३.६.२०२१ व १४.६.२०२१ ( ८ फे-या) रोजी आणि
01360 गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेषच्या सेवा दि. ४.६.२०२१, ६.६.२०२१, ८.६.२०२१, ९.६.२०२१, ११.६.२०२१, १३.६.२०२१, १५.६.२०२१ व १६.६.२०२१ ( ८ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.

६. 01361/01362 मुंबई – दानापूर विशेष अतिजलद

01361 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – दानापूर विशेष अतिजलदच्या सेवा दि. ३.६.२०२१ व १०.६.२०२१ ( २ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत आणि
01362 दानापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष अतिजलदच्या सेवा दि. ४.६.२०२१ व ११.६.२०२१ ( २ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.

७. 01363/01364 मुंबई – दरभंगा विशेष
01363 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – दरभंगा विशेषच्या सेवा दि. १.६.२०२१, ८.६.२०२१ व १५.६.२०२१ ( ३ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.
01364 दरभंगा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेषच्या सेवा दि. ३.६.२०२१, १०.६.२०२१ व १७.६.२०२१ ( ३ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.

८. 01365/01366 मुंबई – छपरा विशेष

01365 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – छपरा विशेषच्या सेवा दि. ५.६.२०२१ व १२.६.२०२१ ( २ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत आणि
01366 छपरा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष अतिजलदच्या सेवा दि. ७.६.२०२१ व १४.६.२०२१ ( २ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.

९. 01355/01356 मुंबई – गोरखपूर विशेष
01355 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेषच्या सेवा दि. १.६.२०२१, ८.६.२०२१ व १५.६.२०२१ ( ३ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत आणि 01356 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेषच्या सेवा दि. ३.६.२०२१, १०.६.२०२१ व १७.६.२०२१ ( ३ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.

सर्व विशेष ट्रेन विद्यमान मार्गावर, वेळापत्रकानुसार आणि थांब्यांसह चालविण्यात येतील.

आरक्षण : मुंबई व पुणे येथून सुटणार्‍या पूर्णतः राखीव विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २९.५.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *