भुसावळ प्रतिनिधी
शहरातील श्रीराम नगरातील कोंडेवाडी येथील रहिवासी अतुल गोविंदा बोरोले वय २४ या तरुणाने स्वतःचा मोबाईल व पाकीट रुमालात बांधून एका मुलाच्या हस्ते घरी पाठवून दिले. त्यानंतर जामनेर रस्त्यावरील वाघुर नदीच्या जुन्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी अतुल दुसऱ्याच्या मोबाईल वरून चुलत भावाला संपर्क करत नदीत उडी घेत असल्याचे सांगितले. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .

श्रीराम नगरातील रहिवासी अतुलने गुरुवारी सायंकाळी त्याच्याजवळील मोबाईल व पैशाचे पाकीट हे एका रुमालात बांधून एका मुलाच्या हातून घरी पाठवून दिले. नंतर त्याने दुचाकीने जामनेर रोडवरील वाघुर नदीवरील पूल गाठला तेथे दुचाकी उभे करून बाजूलाच मासेमारी करणार्या एका जणाकडून मोबाईल घेत चुलत भाऊस संपर्क साधला. संबंधिताच्या मोबाईल परत दिल्यावर काही वेळाने जुन्या पुलावरून वापरून वाघूर नदीपात्रात उडी मारली .हा प्रकार मासेमारी करणाऱ्या च्या लक्षात आला. त्यांच्या मोबाईलवर पलीकडून कॉल आला मात्र त्यांनी संबंधित तरूणाने नदीत उडी मारण्याची माहिती दिली. त्यानंतर पलीकडून वारंवार कॉल करून विचारणा होण्यास सुरुवात होताच मासेमारी करणाऱ्यांनी जामनेर पोलीस ठाणे गाठले त्यानंतर पोलिस निरीक्षक इंगळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. नदीत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला पण अंधारामुळे अडचणी आल्या.माहिती मिळताच नगरसेवक निर्मल कोठारी, एडवोकेट भोजराज चौधरी, नितीन धांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोठारी ते पहाटे चार पर्यंत तेथे तळ ठोकून होते शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अतुलचा मृतदेह सापडला यावेळी बाईक ची चाबी त्याच्या पॅन्टच्या खिशात होती .त्यानंतर जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी बारा वाजता भुसावळ येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील,भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील किराणा दुकान चालवतात


