भुसावळ (प्रतिनिधी )-

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना चा उद्रेक झाला असून आज मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता भासत आहे .
रक्त पतपेढ्या कडे सुद्धा रक्ताच्या मागणीपेक्षा साठा कमी आहे.या सामाजिक भावनेतून
9 मे हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 मे 2021 रविवार रोजी महाराणा प्रताप राजपूत समाज संघर्ष समिती भुसावळ तालुका द्वारा महारक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
तरी सर्व समाज बांधव यांनी धन्वंतरी ब्लड बँक,आनंद नगर,जामनेर रोड भुसावळ. येथे सकाळी 10 ते 12 पर्यंत 4या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन समाजपयोगी कार्य आणि नवीन आदर्श निर्माण करावा असे आवाहन प्रविणसिंह पाटील, संजयसिंग चौहान,श्री अभिजित पाटील,श्री अमोल पाटील,श्री बी.एन.पाटील,श्री यशवंत चौधरी,श्री श्याम गोविंदा,श्री सोनी ठाकूर,श्री सुरेंद्रसिंग पाटील,श्री चंदूसिंग चव्हाण , दामोदर राजपूत,श्री हर्षल पाटील,श्री गोपी राजपूत,श्री सुरतसिंग पाटील,श्री सुनील चौधरी आणि समस्त राजपुत समाज भुसावळ तालुका यांनी केले आहे . तसेच समस्त राजपुत समाज भुसावळ तालुका यांनी शिबिरास रक्तदान करावे असेही आयोजकानीं कळविले आहे .


