भुसावळ (प्रतिनिधी ) –
जळगांव जिल्ह्यातील वाढत्या रुग्णांची स्थिती पाहून शहरातील गडकरी नगर भागातील सनराईज अपार्टमेंट येथे जिल्ह्याधिकारी तथा अध्यक्ष जिल्ह्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगांव यांच्या आदेशावरून दिनांक २९/३/२०२१ रोजी ३० खटांचे मुस्कान कोविड सेंटरला जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जळगांव कडून सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे . सदर सेंटरला बॉम्बेे नर्सिंग होम अँक्टनुसार कोविड काळात नियमांचा भंग केल्याप्रकरणी प्रशासनांने मुस्कान कोविड सेंटरवर तात्पुरते निलंबनाची कारवाई केली . परंतू ही कारवाई
कुठलेही आदेश नसतांना केल्याचा आरोप डॉ.तौसीफ खान यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
याबाबत डॉ तौसीफ खान म्हणाले की , भुसावळ शहरातील कोविड -१९ रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्या शल्य चिकित्सक जळगांव कडून दिनांक २९/३/२०२१ रोजी मुस्कान हॉस्पिटलला कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. दरम्यान
रेमडीसीविर इंजेक्शनच्या अनियमितते संदर्भात हॉस्पिटलला ई-मेल व्दारे दिनांक १०/०४/२०२१ रोजी जिल्ह्या शल्य चिकित्सक कार्यालय सामान्य रुग्णालय जळगांव कडून लेखी खुलासा विचारण्यात आला होता.दुसऱ्या दिवशी लेखी खुलासा सादर करण्यात आल्यानंतर सदरील कार्यालयाच्या चौकशी समितीकडून कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. तसेच दिनांक १५/०४/२०२१ कोषाधिकारी जळगांव यांचे समितीकडून रुग्णालयाचे बिल व रेमडीसीविर संबंधी ऑडिट करण्यात आले होते.त्यावेळी कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून न आल्याने समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आलेले होते.तसेच हॉस्पिटलला रेमडीसीविर पुरवठा जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून सुरळीत करण्यात येत आहे.मग अचानक रुग्णालयाच्या निलंबना बाबत अद्याप पावतो जिल्ह्या शल्य चिकित्सक कार्यालय सामान्य रुग्णालय जळगांव कडून कोणतेही अधिकारीक पत्र अथवा ई मेल मुस्कान कोविड सेंटरला प्राप्त झालेला नाही.उलट सदर बातमी दिनांक २७/०४/२०२१ रोजी वृत्तपत्रात प्रकाशित झाल्याने हॉस्पिटलची बदनामी झालेली असून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णालयांच्या नातेवाईकांवर त्यांचा विपरीत परिणाम होत आहे.रुग्ण व नातेवाईकांत संभ्रम ,भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.तात्पुरते निलंबन झाल्याने रुग्णालयात नवीन रुग्ण अँडमीट करू शकत नसल्याने तसेच रुग्णांसह नाटवाईकांचा रोष आमच्यावर उमटत आहे.योग्य खुलासा त्वरित सादर केल्यावरही जिल्ह्या प्रशासनाकडून हॉस्पिटलवर झालेली कारवाई अन्यायकारक आहे. दररोज कार्यालयाकडून मिळणाऱ्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत आहोत.
सदर झालेली कारवाई संदर्भात डॉ.तौसीफ खान यांनी जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे दुपारी १.३० वाजेच्या सुमारास कोविड सेंटरचे सर्व ऑडिट अग्निशमन सुरक्षा यंत्रणेबाबत,इलेकट्रीक संदर्भात, तसेच दिनांक २७/०४/२०२१ रोजी जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून ३ रेमडीसीविर इंजेक्शन सुद्धा मंजूर करण्यात आले असून सर्व कागदपत्र सादर केल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपर्यत जिल्ह्याधिकारी यांच्याकडून रिसिव्ह झाले नसल्याबाबत डॉ.तौसीफ खान यांनी पत्रकार परिषदेत खुलासा दिला.मुस्कान कोविड सेंटर तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे की नाही तसेच यापुढे कोविड सेंटर सुरू ठेवायचे की नाही का मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण न दिल्यास महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमच्या हॉस्पिटलची बदनामी व अन्याय झाल्याबाबत न्याय मागण्यासाठी जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.



