भुसावळ (प्रतिनिधी )-
पुढील तपशिलानुसार रेल्वेने मुंबई व गोरखपूर दरम्यान विशेष दैनिक गाड्या सुधारित वेळ, रेल्वे क्रमांक व संरचनेसह चालवण्याचे निश्चित केले आहे.

1) ट्रेन क्रमांक 02542/02541 आता 02103/02104 दैनिक अतिजलद विशेष म्हणून चालविण्यात येईल
02103 दैनिक विशेष आता ११.४.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०५.२३ वाजता सुटेल आणि गोरखपूरला दुसर्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल.
02104 दैनिक विशेष आता १२.४.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत गोरखपूर येथून २२.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल.
थांबे : भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, झांसी, उरई, पोखरायण, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बादशाह नगर, गोंडा, बभ्नान, बस्ती आणि खलीलाबाद
सुधारित संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ४ द्वितीय आसन श्रेणी.
2) ट्रेन क्रमांक 01015/01016 आता 02538/02537 दैनिक अतिजलद विशेष म्हणून चालविण्यात येईल
02538 दैनिक विशेष आता १३.४.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.३५ वाजता सुटेल आणि गोरखपूरला दुसर्या दिवशी ०७.०५ वाजता पोहोचेल.
02537 दैनिक विशेष आता ११.४.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत गोरखपूर येथून १७.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्या दिवशी ००.१० वाजता पोहोचेल.
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, रावेर, बुरहानपूर, खंडवा, खिरकिया, हरदा, तिमानी, इटारसी, होशंगाबाद, मंदीदीप, हबीबगंज, भोपाळ, विदिशा, गंज बसोदा, बीना, ललितपूर, झांसी, उरई, कालपी, कानपूर सेंट्रल, उन्नाव, ऐशबाग, बादशाह नगर, बाराबंकी, गोंडा, माणकापूर, बभ्नान, बस्ती आणि खलीलाबाद
सुधारित संरचना: २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ४ द्वितीय आसन श्रेणी आणि एक पेंट्री कार.
टीप :
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 01015 विशेषच्या दि. ९.४.२०२१ व १०.४.२०२१ रोजी आणि 02542 विशेषच्या दि. ९.४.२०२१, १०.४.२०२१ व ११.४.२०२१ रोजी कोणत्याही फे-या नसतील.
आरक्षण: 02103 आणि 02538 या पूर्णपणे राखीव असलेल्या विशेष गाड्यांचे सामान्य शुल्कासह बुकिंग १५.२.२०१२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.
विशेष गाड्यांच्या प्रवाशांनी विस्तृत माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी सीओव्हीआयडी 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.


