आदिवासी पाड्यांवर हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न ;

यावल –
यावल तालुक्यातील गायरान व रोशन बर्डी या आदिवासी पाड्यांवर देवगिरी कल्याण आश्रमाच्या नगरीय महिला समितीच्यावतीने हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
हळदी कुंकू चा कार्यक्रम महिला आपापल्या घरी नातेवाईक व सखीच्या समवेत साजरा करतात. पण जनजाती समाजाच्या महिला या परंपरे पासून लांबच असाव्यात व त्यांनाही ही प्रथा आपली संस्कृतीचा एक भाग आहे असे वाटावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भुसावळ येथील कल्याण आश्रमाच्या महिला गटाने या पाड्यांवर हळदी कुंकू कार्यक्रम साजरा केला ‌. या वेळी महिलांना ब्लाऊज पीस, सौभाग्य वाण दिले व लहान मुलांना खाऊचे वाटप केले तसेच महिलांच्या समस्या जाणून घेतल्या कार्यक्रमाच्या सुरवातीला , भारत माता, बाळासाहेब देशपांडे व बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमाला एडवोकेट चित्र आचार्य ‌, एडवोकेट जास्वंदी भंडारी, एडवोकेट जयश्री देशमुख, सुनिता राणे, गीता ताई नागराज, सुनंदा वाणी, अडवोकेट वैशाली चौधरी, सुनंदा खरे, सविता कुलकर्णी, वीरसिंग वसावे व एडवोकेट निलेश भंडारी आदि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *