पत्रकार संतोष ढिवरे यांचे मुंबईत निधन –

जळगाव
मुंबईतील जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू असतांना साइमतचे पत्रकार संतोष ढिवरे यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. संतोष ढिवरे यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच सोमवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री उशीरा जळगावात आणले जाणार असून येथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. संतोष ढिवरे यांच्या निधनाने जळगावच्या पत्रकारीता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *