भुसावळ (प्रतिनिधी )-
कौटुंबिक जबाबदारी सांभाळतांना प्रत्येक महिलेने स्वतःचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवावे यासाठी महिला पतंजली योग समितीने पुढाकार घेवून महिलांकरीता योगासन क्लासेस सुरु केले आहे महिला सशक्त असेल तर कुटुंब सुद्धा निरोगी व सशक्त राहते असे मत महिला पतंजली योग समिती राज्य कार्यकारणी सदस्या सौ महानंदा पाटिल यांनी व्यक्त केले . प्रसंगी
तसेच महिलां मधील सुप्त गुणांना वाव मिळावा याकरीता विविध खेळ खेळण्यात येवून सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी उपस्थित महिलांनी खेळाचा मनसोक्त आनंद लुटला .
येथील महिला पतंजली योग समिती भुसावळ यांचे तर्फे प्रतिवर्षानुसार यंदाही रविवार ७ फेब्रुवारी रोजी स्थानिक लक्ष्मीनारायण नगर येथील गजानन महाराज मंदिर येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपंन्न झाला
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
डॉ . सौ अनिता भिरूड , नगरसेविका
सौ सुषमा पाटील ,राज्य कार्यकारणी सदस्या सौ महानंदा पाटील ,ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या तालुकाध्यक्ष पत्रकार उज्वला बागुल , सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ राजश्री नेवे , महिला मुक्ती संघटना जिल्हा अध्यक्ष सौ संगीता भामरे , पतंजली महिला समितीच्या रूपाली पाटणकर, या उपस्थित होत्या .प्रसंगी सौ राजश्री नेवे , सौ संगीता भामरे , उज्वला बागुल ,यांनी मनोगत व्यक्त केले .
दरम्यान लींबू चमचा , बकेट मध्ये बॉल टाकणे यासह विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले . महिलांनी खेळाचा मनसोक्त आनंद लुटला .
खेळात विजेत्या महिलांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देण्यात आले . यावेळी महिलांना तिळगुळ व हळदी कुंकू देण्यात येवून वाण म्हणून भेट वस्तू वाटण्यात आल्या. तर उपस्थित महिलांना तिळगुळ व हळदी कुंकू देण्यात येवून वाण म्हणून भेट वस्तू वाटण्यात आल्या यावेळी सौ मायाताई चौधरीं , सौ स्मिता माहुरकर , सौ मंदाकिनी केदारे यांचेसह परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या .कार्यक्रम यशस्वितेसाठी
सौ मीना राजपूत ,वर्षा राणे, अर्चना पाटील, मंजू अग्रवाल, वर्षा लोखंडे, हर्षा धांडे, जयश्री ताई, हर्षा पाटील, प्रतिभा सोनवणे, आरती गुरव, संगीता बारी , कांता बागले, मंदाकिनी केदारे, आशा चौधरी ललिता चौधरी, पुनम भंगाळे, अर्चना भगत यांचेसह गजानन महाराज नित्य योग वर्ग महिला पतंजली योग समिती सर्व कार्यकर्ता यांनी परिश्रम घेतले .



