भुसावळ पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा राजीनामा ;


भुसावळ (प्रतिनिधी )–

भुसावळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.पंचायत समितीच्या उपसभापती वंदना सदानंद उन्हाळे यांनी सभापती सौ मनिषा पाटील यांच्या कडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला तर सभापती मनीषा भालचंद्र पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कडे दि १ फेब्रुवारी रोजी भुसावळ पंचायत समिती सदस्य विजय भास्कर सुरवाडे व सुनिल श्रीधर महाजन यांच्या साक्षीने राजीनामा सादर केला. ठरलेल्या नियमा प्रमाणे राजीनामा दिला असल्याने सभापती मनीषा पाटील व उपसभापती वंदना उन्हाळे यांचे अभिनंदन केले जात असून आता सभापती पदी वंदना सदानंद उन्हाळे यांची तर उपसभापती पदी प्रिती मुरलीधर ( गोलू ) पाटील यांची वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *