भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रदीर्घ कालावधिनंतर आज पुन्हा पहिल्यांदा दिनांक 31/01/2021 रविवार पोलिओ दिवस रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या सहकार्याने राबविन्यात आला .
आज संपूर्ण विश्वामध्ये पोलिओ दिन साजरा होत आहे याअन्तर्गत रोटरी क्लब ऑफ भुसावळच्या प्रांगणात भुसावळ नगरपालिकेच्या सौजन्याने पोलिओ बूथ लावण्यात आला होता यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळचे प्रेसिडेंट रोटेरियन गजानन ठाकूर यांच्या हस्ते पोलिओ डोसा चे वितरण करण्यात आले यावेळी पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन अरुण मांडळ कर, राजेश अग्रवाल, महेश भराडे, रवींद्र शुक्ला, प्रदीप दवे. रोटेरियन सतीश अग्रवाल, सारंग चौधरी, मदन बोरकर, गोपीनाथ अय्यर, राजेंद्र पाटील आदीं उपस्थित होते या प्रोजेक्ट साठी श मनोज गुलाईकर यांनी परिश्रम घेतले.



