भुसावळ (प्रतिनिधी )-
हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी सोहेल हामिद कच्छी याची आशिया वर्ल्ड मून आभासी परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे, जगभरातून 9368 विद्यार्थ्यांनी या साठी अर्ज केला होता त्यात मधून सोहेलची निवड झाली आहे.
आशिया वर्ल्ड मॉडेल युनायटेड नेशन्स, व्हर्च्युअल कॉन्फरन्सचे मार्च महिन्यात आयोजन करण्यात आले आहे याचे स्वीकृती पत्र आज सोहेलला प्राप्त झाले.
या परिषदेत जागतिक सहकार्याच्या माध्यमातून संकटाचा सामना करणे असा विषय मांडला जाणार आहे.
हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे. टी. अग्रवाल, सचिव एम. डी. शर्मा, संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह, अकॅडमीक डीन डॉ. आर. बी. बारजिभे, कॉम्प्युटर सायन्सचे विभागप्रमुख डॉ. डी. डी. पाटील व सर्व प्राध्यापकांनी त्याचे कौतुक केले.
त्याने आपल्या यशाचे श्रेय पालक व प्राध्यापकांना दिले आहे.



