भुसावळातील पूजार्‍याची 54 हजारात फसवणूक ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील तापी नगर भागातील हिंदी हाउसिंग सोसायटीमधील सप्तशृंगी देवीच्या मंदिराचे पुजारी गजानन जोशी यांची 54 हजार रुपयात फसवणूक झाल्याचे उघड़कीस आल्याने याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील मेथाजी मळा भागातील रहिवासी गिरीश विठ्ठलराव डोलारे यांनी जोशी यांना सांगितले की, विदेशातून माझ्या अकाऊंटमध्ये 50 हजार डॉलरची देणगी आली आहे आणि ते काढण्यासाठी 55 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे मला 55 हजार रुपये द्या. मी तुम्हाला ते 15 दिवसात पैसे परत देतो, असे सांगितल्याने जोशी यांनी एक वेळेस 35 हजार आणि दुसर्‍या वेळेस 18 हजार 999 असे 53 हजार 999 रुपये 9 जून 20 या दिवशी दिले होते. जोशी यांनी डोलारे यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी ते देण्यास टाळाटाळ केल्याने गजानन जोशी यांनी शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून डोलारे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *