भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवसेनाप्रमुख सरसेनापती स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील रेल्वे हॉस्पिटल येथे रक्तदान शिबीरचे आयोजन केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार केंद्रीय अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसुळ यांचे अनुमतीने केंद्रीय कमेटीच्या सूचनेने व भुसावळ डिवीजन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने दि 29 रोजी शुक्रवारी सकाळी 10 ते 5 यावेळेत रेल्वे दवाखाना येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते, जिल्हा पालकमंत्री ना . गुलाबराव पाटिल , यांचे हस्ते होणार आहे. .
तरी जास्तीत जास्त रक्तदाते व कामगारानी येवून रक्तदान करावे व कोरोना रुग्ण व इतर रुग्ण यांचे प्राण वाचवण्यास मोलाचा हातभार लावावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या रक्तदान शिबिरास विशेष सहकार्य गोलवलकर स्वयंसेवी रक्तपेढ़ी जळगाव व .रेल्वे दवाखाना भुसावळ यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभणार आहे. शिबिराचे आयोजन रेल कामगार सेना भुसावळ मंडळ यांनी केले आहे,रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रेल कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.



